शिवराज्याभिषेक
तिथीनुसार जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ त्यादिवशी वार होता शनिवार.
इंग्रजी तारखेप्रमाणे हा दिवस होता सहा जून १६७४. हा दिवस मराठ्यांच्या इतिहासात नव्हे तर अखंड भारताच्या इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा आणि गौरवशाली दिवस.
शिवराज्याभिषेकाची संपूर्ण माहिती व व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा:
पहाटे सुमारे तीन वाजल्यापासूनच या सोहळ्यास प्रारंभ झाला. शिवाजी राजांचा राज्याभिषेक होणार म्हणून जिजामातेला सर्वात जास्त आनंद झाला होता .शिवरायांच्या लहानपणीपासून जिजाऊंनी मनी बाळगलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न आज पूर्ण होत होते, बाळ शिवबा.. सिहांसनाधीश्वर म्हणजेच छत्रपती होणार होते. 32-मण सोन्याचे सिंहासन राज्याभिषेकासाठी घडविले.
राज्याभिषेकासाठी दोन फूट लांब, दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर त्यांनी शिवाजीमहाराजांबर जलाभिषेक केला. त्या वेळी मंत्रपठण आणि मंगलवाद्य चालू होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान करून, जडजवाहिर, अलंकार धारण केले.गळ्यात फुलांचे हार घातले. राजमुकुट घातला. ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. महाराजांनी मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शुभचिन्हांनी सजवले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले.
शिवराज्याभिषेकाचा हा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: