शनी शिंगणापूर
महाराष्ट्रातील शिर्डीच्या जवळ स्थित शिंगणापूर गावातील शनिदेवाची कथा तसेच हि मूर्ती येथे कशी आली असेल याबद्दल आज आपण ऐकणार आहोत.
असे बोलले जाते कि एकेकाळी या गावात खूप मोठा पूर आला होता. पाणी एवढे वाढले होते कि सर्व बुडाले होते. घरे सुद्धा पाण्याखाली गेली होती.
काही लोकांचे म्हणणे असे आहे कि या भयंकर वाहणाऱ्या पाण्यातून एक दैवी शक्ती वाहत होती. जेव्हा पाण्याचा स्तर कमी झाला तेव्हा एका व्यक्तीने एका झाडावर एक शीळा म्हणजेच एक मोठा दगड पहिला. असा दगड त्याने आजवर कधी पहिला नव्हता. आनंदी होऊन त्याने तो दगड झाडावरून खाली उताराला.
आणि त्याला तोडण्यासाठी जसे त्याने त्यावर घाव घातला त्याच क्षणी त्या शिळेतून रक्त वाहू लागले हे पाहून तो तिथून पळून गेला. गावात गेल्यावर त्याने हे सर्व तेथील लोकांना सांगितले. सर्वाना या गोष्टीचे कुतूहल वाटू लागले होते. ज्या ठिकाणी हा दगड ठेवलेला होता त्या ठिकाणी सर्वानी धाव घेतली. आणि तो दगड पाहून सर्व जण आश्चर्यचकित झाले.
परंतु त्यांच्या हे लक्षात येतच नव्हत कि या दगडाचे काय करावे कोणालाहि काहीही सुचेना झाले . या गोष्टीवर विचार करत करत आता रात्र झाली होती. त्यामुळे सर्वानी आता घरी जाऊन उद्या पुन्हा इथे येण्याचा निर्णय घेतला.
याच रात्री एका गावकऱ्याला एक स्वप्न पडलं आणि त्याच्या स्वप्नात प्रत्यक्ष शनिदेव आले आणि बोलले, “मी शनिदेव आहे. जो दगड तुम्हाला आज गावात मिळाला आहे त्याला गावात घेऊन या आणि माझी स्थापना करा.” दुसऱ्या दिवशी त्याने गावकर्यांना हि गोष्ट सांगितली. त्यानंतर सर्वजण या दगडाला उचलण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी गेले व त्यांनी सर्वानी खूप प्रयत्न केले परंतु तो दगड तेथून एक इंच सुद्धा हल्ला नाही.
खूप प्रयत्न केल्यावर लोकांनी घरी जायचा विचार केला व उद्या येताना हा दगड उचलण्यासाठी काहीतरी नवीन मार्ग शोधून आणू असा विचार गावकर्यांनी केला. मात्र या रात्री देखील शिनीदेव त्या गावकर्याच्या स्वप्नात आले व सांगितले कि हा दगड काहीहि युक्ती किंवा अन्य मार्गाने उघडला जाऊ शकत नाही तर हा दगड एकाच मार्गाने उघडला जाऊ शकतो आणि तो असा आहे . शनीदेव त्या माणसाला म्हणाले ,”हा दगड तेव्हाच उचलला जाऊ शकतो जेव्हा दगड उचलणारे लोक सक्खे मामा भाचे असतील”.
म्हणूनच असे म्हटले जाते जर मामा भाचे दर्शनासाठी गेले असता जास्त फायदा मिळतो. त्यानंतर ती शीला सांगितल्याप्रमाणे सर्वानी मिळून एका अशा ठिकाणी स्थापित केले कि जिथे सूर्याची किरणे त्या शिळेवर पडतील व ती जागा प्रशस्त तसेच पूर्णपणे मैदानासारखी होती.
जर तुम्ही शनी शिंगणापूर ला कधी गेलात तर तिथे तुम्हाला थोडे पुढे गेल्यावर एक मैदान दिसेल त्या मैदानाचा मधोमध शनिदेव महाराजांची मूर्ती स्थापित केली आहे. येथे जाणारे भाविक लोक केसरी रंगाचे वस्त्र परिधान करतात. असे बोलतात कि मंदिरात कोणी पुजारी अथवा भटजी नाही आहेत . मंदिरात भक्त प्रवेश करतात शनिदेवाचे दर्शन घेतात व सरळ मंदिरातून बाहेर निघून जातात.
नेहमी च शनिदेवाच्या या मूर्तीवर राईच्या तेलाचा अभिषेक केला जातो मंदिरात येणारे भक्त आपल्या इचछेनुसार इथे देवाला तेलाचे दान देतात. असे म्हटले जाते कि मंदिरातुन दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर भक्ताने मागे वळून ना पाहता पुढे पाहतच निघून जावे जरी कोणी आवाज दिला तरीही मागे वळून पाहू नये. शनिदेवाला नतमस्तक होऊन सरळ सरळ बाहेर यावे. मागे वळून पाहिल्यास अपरिचित गोष्टी घडतील.
मित्रानो जर आपण येथे गेलात तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास नाही बसणार. आपणाला विश्वास नाही होणार पण या गावातील कोणत्याही घर अथवा दुकानाला एकही दरवाजा नाही आहे. आणि याच कारणामुळे हे गाव जगामध्ये खूप प्रसिद्ध झाले आहे
मित्रानो, येथे शनिदेवाचा एवढा प्रभाव आहे कि येथे कोणी चोर चुकूनही चोरी करू शकत नाही आणि जर एखाद्याने चोरी केली च तर तो ती चोरी केलेली वस्तू या गावाच्या बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. अशा वेळी तो चोर रस्ता चुकतो.
आपण एकदा शनी शिंगणापूर येथे भेट द्याच. इथे आल्यावर तुम्ही निराश होणार नाही. हे मंदिर खरंच चमत्कारांनी भरलेले आहे आणि शिंगणापूर चे जनजीवन एकदातरी पाहण्यासारखे नक्कीच आहे.
जय शनिदेव !